111+ Best Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत वाचा! प्रेम, आपुलकी आणि भावंडांच्या नात्याची गोडी व्यक्त करणाऱ्या खास Raksha Bandhan Wishes in Marathi, Insta captions आणि WhatsApp संदेशांसाठी क्लिक करा.

Raksha Bandhan Wishes in Marathi  रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi

1.लहानपणीचा सोबती, आजही माझा रक्षक आहेस,
तुझ्याशिवाय जगणं अपुरं वाटतं बरं का रे!
खूप भांडणं झाली, पण प्रेम कधी कमी झालं नाही,
माझा भाऊ – जिवाला जीव देणारा, रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा!

2.माझ्या खोडकर भावाला आज एकच सांगते,
तुझ्या मस्तीशिवाय दिवसच जात नाही रे!
प्रेमात गुंफलेलं बंधन आहे आपलं खास,
रक्षाबंधनाच्या तुला माझ्याकडून शुभेच्छा प्रेमळ आणि झक्कास!

3.खूप लाडाचा, खूप प्रेमाचा माझा भाऊ,
कधी मस्करी, कधी भांडणं, पण शेवटी एक जीव दोघे आपुलकीचे!
तू आहेस म्हणून मी भक्कम आहे,
रक्षाबंधनाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा!

4.माझा भाऊ म्हणजे माझं हास्य, माझा आधार,
कधी चिडवतो, कधी सांभाळतो – एकदम perfect यार!
आज रक्षाबंधनाच्या दिवशी सांगते,
तुझ्यासारखा भाऊ मिळणं म्हणजे माझ्या नशिबाची गोष्ट!

5.अडचणीत धावून येणारा, आनंदात मस्करी करणारा,
माझा भाऊ म्हणजे जिवाला जीव देणारा!
प्रेम, राग, आणि मस्ती – सगळं तुझ्यातच आहे,
रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा रे भाऊ.

6.जरी रोज भांडतो, तरी मनात तुझंच घर आहे,
तू नसशील तर सगळंच भकास वाटत रे!
तुझ असण हवहवस वाटत
माझा मस्तिखोर, खोडकर पण जिवलग भाऊ,
रक्षाबंधनाच्या गोड आणि प्रेमळ शुभेच्छा! 💫

7.माझं हसणं, माझं रडणं, सगळं तुझ्याशीच जोडलेलं,
भावाच्या मिठीत एक वेगळीच ताकद असते!
तुझ्यासारखा भाऊ म्हणजे आयुष्याचं सोनं!
Happy Raksha Bandhan Bhau ❤️

8.माझ्या हर एक मस्तीला तुझी साथ मिळाली,
भांडणातही तुझी काळजी लपलेली होती!
तू नसशील तर मजा नाही जगण्यात,
रक्षाबंधनाच्या मस्त गोड शुभेच्छा!

9.तुझं रागावणं, चिडवणं आणि लपून चॉकलेट देणं,
हे सगळं मिस करते मी…
माझा खरा सुपरहिरो म्हणजे माझा भाऊच!
Happy Rakhi Day, चिडक्या भावासाठी!

10.तू चिडवतोस, पण माझ्यासाठी रडतोसही,
तुझी care माझ्या डोळ्यांत पाणी आणते…
माझा भाऊ म्हणजे हृदयात बसलेलं प्रेमाचं गुपित!
रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा! 🥰

Raksha Bandhan Wishes in Marathi for Brother

11.बाहेर कितीही मजबूत वाटलो तरी,
भावाच्या मिठीसमोर सगळं हळवं होतं…
माझ्या जिवलगा भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💖

12.तू नसताना सगळं शांत वाटतं,
तुझं चिडवणंही हवंहवंसं वाटतं…
माझ्या मस्त भावाला – Happy Raksha Bandhan Bhau! 😄

13.प्रेमाच्या रेशमात बांधलेलं हे बंध,
कधीच तुटणार नाही, वाढतच जाईल!
तू आहेस म्हणून मी आहे…
रक्षाबंधनाच्या सुंदर आणि जिव्हाळ्याच्या शुभेच्छा! 🧵💙

14.भांडणं रोजची, पण प्रेम खूप खास,
भावा शिवाय काहीच नाही जीवनात आस!
Happy Rakhi माझ्या झकास भावा!

15.तू नाहीस तर मजाच नाही,
तुझं हसणं, चिडवणं हवंहवंसं वाटतं…
तुझ्यासोबत वाढलेल्या आठवणींना आज परत मिठीत घेते…
Happy Raksha Bandhan भाऊ! 🌸

16.दिसायला rough, पण मनाने soft,
माझा भाऊ म्हणजे combo ऑफ मस्ती & love!
रक्षाबंधनाच्या धमाकेदार शुभेच्छा रे हिरो! 💣💥

17.तू असलास की मी safe feel करते,
भांडतोस पण माझ्यासाठी जगाशी लढतोस!
माझा protector, माझा comedian, माझा भाऊ – I love you! 💝

18.नातं फक्त राखीचं नाही,
हे आहे त्या विश्वासाचं, प्रेमाचं, आणि आठवणींचं!
रक्षाबंधनाच्या प्रेमळ, heart touching शुभेच्छा! 🫶

19.कधी भांडलो, कधी रडलो,
पण शेवटी ‘माझा भाऊ’ म्हणून मिठीत घेतो…
या नात्याला तोड नाही रे!
Happy Rakhi 💞

20.बघितलंस का? अजूनही तुझ्याच नावानं हसते,
तुझं आठवणं म्हणजे नकळत गालावर हास्य!
भावा, तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 😌💗

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi for Brother

21.सांग ना भावा… तुझ्याविना हे आयुष्य कसं पूर्ण होईल?
तुझं हास्य म्हणजे माझं जगणं,
रक्षाबंधनाच्या या दिवशी,
माझं सारं प्रेम तुझ्यासाठी! 💌

22.माझं रडणं, माझं हसणं… तूच सगळं पाहिलं आहेस,
माझ्या प्रत्येक क्षणात तू माझ्यासोबत आहेस…
तुझ्यासारखा भाऊ म्हणजे नशिबाचा Jackpot! 🎁
Happy Rakhi!

23.तू चिडवतोस, मी रागावते,
पण तूच सर्वात जवळचा माझा मित्र आहेस!
जन्मभराचं हे बंध खूप खास आहे…
रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा! 👫

24.माझा मस्तखोर भाऊ –
संध्याकाळी चहा हवा म्हणणारा, चहावरून भांडणारा ,
पण लपून मला बिस्कीट देणारा!
असाच रहा प्रेमळ,गंमतदार!
Happy Raksha Bandhan रे !

25.आई-बाबा रागावले तरी,
माझ्या बाजूने उभा असतोस तूच…
माझा सावलीसारखा पाठीराखा!
रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा! ☀️🌈

26.भांडणं ही आमची भाषा,
पण त्यामागे लपलेलं प्रेम वेगळंच असतं…
रक्षाबंधन हे फक्त धागा नाही, हृदयाला जोडणारा दुवा आहे! 🧶💖

27.तुझ्यासोबत लहानपण जगलो,
आता मोठं होतानाही तुझ्याशिवाय राहवत नाही!
भावा, तुझं स्थान हृदयात कायमचं आहे!
Happy Rakhi ❤️

28.खूप काही बोलता येत नाही,
पण तुझ्यासाठी जीवही देईन – हे नक्की!
माझा बंध… माझा अभिमान!
रक्षाबंधनाच्या मस्त शुभेच्छा! 💪

29.अडचणी आल्या, संकटं आली,
पण तू हात धरलास आणि वाट सापडली…
तू आहेस म्हणून मी आहे!
Happy Raksha Bandhan माझ्या जीवाभावाच्या भावासाठी!

30.भावा… तुझं खळखळून हसणं,
माझ्या प्रत्येक दिवसात रंग भरतं…
रक्षाबंधनाच्या दिवशी तुझ्यासाठी फक्त एकच प्रार्थना –
हसत रहा, झळकत रहा! ✨

Raksha Bandhan Wishes in Marathi Text

31.तू जरी लांब असलास, तरी मनात रोज असतोस,
रोज सांगायचं राहून जातं…
पण खूप खूप आठवण येते रे भावा!
रक्षाबंधनाच्या खूप प्रेमळ शुभेच्छा! 🌸

32.लहानपणी मी तुझ्या मागे लपायचे…
आजही संकटं आली की तुझंच नाव आठवतं…
माझा आधार, माझा भाऊ – तूच माझं बळ आहेस! ❤️

33.कधी लाडाचं बोललास, कधी ओरडलास…
पण माझ्यासाठी तुझं प्रेम कधीच कमी झालं नाही,
तुझ्यासारखा भाऊ मिळणं हे नशीबचं काम आहे! 💝

34.तू नाहीस आज जवळ, पण तुझी राखी बघून डोळे पाणावतात,
सारं लहानपण डोळ्यासमोर येतं…
किती सुंदर होतं रे ते दिवस!
Happy Rakhi माझ्या लांबच्या पण जवळच्या भावाला… 📦

35.पैशाने मोठं काही नाही लागत भावा,
तुझं “मी आहे ना!” एवढंच पुरेसं असतं!
रक्षाबंधन फक्त एक दिवस नाही –
तो तर आपलं नातंच आहे! 🤝

36.कधी मी हट्ट धरला, कधी तू फसवून हसवलंस,
आज आठवतंय – तू किती वेळा माझ्यासाठी मागे उभा होतास…
तू नाहीस तर मी काहीच नाही भावा! 🧡

37.भावा, तू चिडवतोस, हसवतोस…
पण तू माझी काळजी करतोस हे मला रोज जाणवतं…
हे प्रेम अशाच रेशमाच्या धाग्यासारखं घट्ट असू दे! 🧵

38.आयुष्यात कितीही मोठं झालं,
पण भावाच्या मिठीतच खरं समाधान आहे…
हे नातं फक्त राखीचं नाही – ते आपल्या अस्तित्वाचं आहे! 🤗

39.माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारा तू,
आज जेव्हा मी एकटी वाटते – तुझी आठवण येते…
भावा, तुझ्यासारखा कोणीच नाही!
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

40.राखीचा धागा तसा बारीकच असतो,
पण त्यातलं प्रेम अमर असतं…
सावरतोस तू प्रत्येक क्षणात,
भावा, तुझ्या प्रेमानेच माझं जगणं खास आहे! 🧵❤️

Happy Raksha Bandhan Wishes | रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर

41.राखीचा धागा नसतो फक्त हातावर,
तो असतो मनात – आठवणींच्या गाठीत!
प्रेम कधी सांगावं लागत नाही,
तुझं माझ्यावरचं प्रेम प्रत्येक कृतीत दिसतं! 🤝

42.हा धागा नाही तुटणारा,
जरी दूर असलो, तरी मनात घट्ट बांधून ठेवणारा!
राखीचं नातं म्हणजे आपलं अटूट प्रेम,
संपूर्ण आयुष्यभराचं! 💌

43.एक धागा, दोन जीव,
प्रेम त्यामध्ये आहे भरपूर …
भावा, तुझ्याशिवाय हे नातं अधुरं,
राखीच्या या दिवशी मनापासून आठवण! 💫

44.राखीचा धागा बांधते मी,
पण प्रेमाचं कवच तू मला देतोस…
हा सण नाही फक्त परंपरेचा,
तो आहे आपल्या नात्याचा सच्चा सण! 🌸

45.राखीचा धागा तुझ्या मनावर बांधते,
कारण तुझं प्रेम नेहमी मनातून मिळालं…
भाऊ, तुझ्या प्रेमाचं ऋण काहीही करून फिटत नाही! 🧡

46.कधी शब्द नाही लागले,

कधी मिठीतच सगळं सांगून झालं…

राखीचा धागा नाही फक्त धागा,

तो म्हणजे आपलं बिनशर्त प्रेमाचा बांधा! 🫶

47.राखीच्या धाग्याइतकंच नाजूक आपलं नातं,
पण प्रत्येक वेळी संकटात strongest झालं…
हे प्रेम नाही मोजता येणार! 🧵💖

48.धागा एकच – पण नातं हजार भावना घेऊन येतं,
त्याच्यात जपलेलं बालपण, प्रेम आणि विश्वास असतो…
हे नातं म्हणजे – जिवाला जीव देणारं! 😍

49.राखीच्या एका धाग्यात गुंफलेली आठवण,
ते लहानपणीचे खेळ, ते आजचे फोन…
प्रेम तसंच आहे अजूनही –
अबोल, पण गहिरे! ☺️

50.राखीचा धागा हातात बांधतो,
पण मनात मात्र अखंड जपतो…
हे बंधन नाही केवळ सणापुरतं,
हे तर जन्मभराचं प्रेम आहे! 🌺

Raksha Bandhan Wishes in Marathi 2025

51.प्रेम म्हणजे रोज भेटणं नव्हे,
तर आठवणींमध्ये एकमेकांसोबत असणं…
राखीच्या धाग्यात गुंफलेलं आपलं नातं,
कितीही दूर असलो, तरी अगदी जवळचं वाटतं! 🌙

52.हा धागा नाजूक असला तरी नातं मजबूत आहे,
प्रेम कमी नाही झालं – उलट वाढतच गेलं…
हे बंध आपलं – न संपणारं, न तुटणारं! ❤️

53.तू लहानपणी राखीला गोड देत होतास,
आता वेळ नाही म्हणतोस – पण मनात मात्र तीच माया आहे…
राखी आणि आपलं प्रेम – वर्षानुवर्षं जसंच्या तसं! 🍬

54.राखीच्या धाग्याला नाही मोल,
तो वाटतो मनाला एक ठेवा अनमोल…
भावा, तुझं प्रेम माझं आयुष्य उजळवतंय! 💫

55.जरी मी तुझ्या पासून दूर असले,
तरी तुझ्या आठवणी अगदी जवळच्या आहेत…
राखी फक्त एक दिवस नाही –
ती आपल्या नात्याची ओळख आहे! 📿

56.राखीच्या धाग्याने बांधलेलं आपल नातं,
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा प्रेम बोलतं…
तू आणि मी – एकमेकांसाठी जन्मोजन्मीचं बंधन! 🧶

57.तू नाहीस दरवेळी माझ्यासोबत,
पण प्रत्येक संकटात तुझा आधार जाणवतो…
राखी म्हणजे विश्वास, प्रेम, आणि नात्याची ताकद! 🔗

58.राखीचं नातं नाही फक्त भावा-बहिणीचं,
ते आहे – जपलेलं बालपण, जिव्हाळा, आणि न विसरता येणारं प्रेम…
हे बंध विसरता येणारं नाही! 🤍

59.प्रेमाचं खरं रूप म्हणजे बंध,
जे नाते रक्ताचं नसलं तरी हृदयाचं असतं…
राखीचं हे बंध म्हणजे तुझं माझ्यावरचं अबोल प्रेम! 🙏

60.लहानपणी तुझ्या हातावर राखी बांधताना,
डोळ्यात मस्ती आणि हृदयात माया असायची…
आज मोठं झालो आपण, पण तीच हुरहुर अजून उरते! 🧡

Brother Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भावासाठी

61.राखीचा धागा होता छोटासा,
पण त्यामागचं प्रेम मोठ्ठं होतं…
त्या दिवसांची आठवण आजही डोळे पाणावते! 💧

62.त्या पाटीवर बसून तुला राखी बांधायचं,
मग गोड खाऊ मिळायचा…
आज ते दिवस शोधतोय – आठवणींच्या कोपऱ्यात! 🍭

63.भावा, तू लहान होतास तेव्हा खूप हट्टी होतास,
आता मोठा झालास – पण प्रेम अजूनही तेवढंच आहे…
राखीचा धागा – पवित्र प्रेमाचं स्मरण! 🤲

64.राखी म्हणजे फक्त एक धागा नाही,
ती तर आपल्या बालपणीची आठवण आहे…
त्या चिमुकल्या प्रेमातच खरं सौंदर्य लपलं होतं! ✨

65.ते लहानसं गिफ्ट, ती छोटिशी हसरी मिठी,
आज आठवतं की हृदय भरून येतं…
राखीच्या दिवशी तूच माझं सगळं होतास! 🎁

66.ते जुने फोटो, राखीचे गोड पदार्थ,
सगळ्या गोष्टी मनाच्या कपाटात आहेत…
आता फक्त हुरहुर आहे आणि राखीचं पवित्र बंधन! 🕊️

67.तू चिडायचास की मी रडायचे,
राखीला मग गोड गोड बोलायचास…
ते लहानपण खरंच सोनं होतं रे! 💛

68.राखीच्या दिवशी तुझ्या हातात राखी बांधून,
मनात एकच भावना असायची – “भाऊ, तू कायम माझ्यासोबत रहा!”
आजही तीच भावना आहे, तीच राखी, तेच प्रेम! 💞

69.लहानपणी तुझं रक्षण मागायचं,
आज फक्त तुझं अस्तित्व पुरेसं वाटतं…
हे नातं शब्दांत नाही सांगता येत – ते फक्त जगता येतं! 🤍

70.लहानपणी तुझ्यासोबत खेळताना,
राखीचं खरं अर्थ कळला नव्हता…
आज मात्र कळतं –
ते प्रत्येक भांडण, आणि त्यावरचं प्रेम खूप खास होतं! 🤗

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी संदेश

71.कधी भांडलो, कधी रडलो,
पण शेवटी नेहमीच तुझ्याच मिठीत आलो…
राखी म्हणजे आपलं अटूट नातं – रुसवा असो की हसवा! 😄💕

72.लहानपणीची राखी आणि आजची राखी,
फक्त गिफ्ट बदललंय – प्रेम नाही!
भांडण, राग, हसू आणि मनवणं –
सगळं अजूनही तसंच आहे! 🧵💫

73.त्या लहानशा वयात जेव्हा मी रुसायचे,
तू चॉकलेट देऊन गोड गप्पा मारायचास…
आजही तुझ्या त्या मनवण्याचीच वाट बघते! 🍫❤️

74.राखीच्या दिवशी भांडायचो,
गिफ्ट न दिलं तर रुसायचो…
पण शेवटी गोंजारून तूच म्हणायचास – “चल, हस आता!” 😌

75.कधी तू चिडलास, कधी मी रुसले,
तरी दरवर्षी राखीला तुझ्या हातात धागा बांधलाच…
कारण हे बंधन फक्त प्रेमाचं नव्हे – ते जीवनभराचं आहे! 🤲

76.कधी हसून दिवस गेले,
तर कधी अश्रूंनी आठवणी येतात…
तू आणि मी – या नात्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांसोबत होतो! 💞

77.कधी राग, कधी जिव्हाळा,
कधी गप्पा, कधी शांतता…
आपलं नातं म्हणजे – प्रत्येक भावना जगलेलं खरं प्रेम! 💌

78.भांडणं लहानपणात होती,
आज ती आठवणी झाल्या…
पण त्या आठवणीतलं प्रेम अजूनही मनात आहे! 🧠❤️

79.तू हट्टी होतास, मी रडकी…
तरी तूच मला मनवायचास – त्या एका मिठीत सगळं विरघळायचं…
राखी म्हणजे तेच सगळं पुन्हा आठवण्याचा दिवस! 🫂✨

80.लहानपणीच्या त्या खेळात,
भांडणातही होती आपुलकीची साथ,
आज राखीच्या धाग्यात पुन्हा गाठी घट्ट झाल्यात,
आपलं नातं प्रत्येक क्षणात फुलत जातंय!

Raksha Bandhan Quotes in Marathi for Brother

81. भांडतो, हसतो, कधी रडतो…
पण शेवटी माझा भाऊच माझा आधार असतो,
राखीचा धागा एवढंच सांगतो,
हे नातं जन्मोजन्मी साथ देत राहो!

82. राखी फक्त एक धागा नाही,
तो माझ्या लहानपणाचा साक्षीदार आहे,
रुसवे-फुगवे, हळवे क्षण आणि मायेचा आधार,
हे आपलं नातं खूप खूप खास आहे!

83. लहानपणची ती मिठी,
आता शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही,
राखीच्या निमित्ताने आठवतंय सारं,
भाऊ, तुझ्यासोबतच माझं आभाळ भरारतंय!

84. कधी हसवतोस, कधी रागवतोस,
कधी गुपचूप खाऊ देतोस,
तुझा रागही प्रेमाचा असतो,
माझ्या भावाशी असलेलं नातं अजोड असतो!

85. राखीच्या धाग्याने बांधलेलं हे नातं,
भावनांनी सजलेलं, आठवणींनी भरलेलं,
तुझं अस्तित्व म्हणजे माझं बळ,
तुझ्या साठीनंच जगणं सगळं!

86.बालपणापासून आजतागायत,
आपलं नातं प्रत्येक क्षणी घट्ट झालंय,
कधी रुसणं, कधी मनवणं,
तरी शेवटी आपलं प्रेमच जिंकतंय!

87.त्या चिमुकल्या हातांनी बांधलेली राखी,
आजही आठवते भावाच्या डोळ्यातली चमक,
कितीही मोठे झालो तरी,
आपलं नातं अजूनही तितकंच निरागस आहे!

88. तुझा पाठिंबा म्हणजे माझं बळ,
तुझं हसू म्हणजे माझा सण,
राखीचा हा धागा दरवर्षी सांगतो,
आपलं नातं आहे स्वर्गाहूनही पवित्र!

89. एक राखी, हजार आठवणी,
एक भाऊ, अनंत माया,
कधी वाटतं, तू नसतास तर मीच अधुरी,
तुझ्यासारखा भाऊ माझ्यासाठी दुर्मीळच!

90.राखीचं नातं हे फक्त धाग्याचं नसतं,
ते आठवणींचं, प्रेमाचं, आणि काळजीचं असतं,
लहानपणापासून आजवर तू माझ्यासोबत आहेस,
रुसवे-फुगवे असले तरी प्रेमाचं बंधन तसंच आहे! ❤️

नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुभेच्छा

91. भांडणं खूप झाली आपली, पण प्रेम त्याहून मोठं,
राखीचा धागा आपलं नातं घट्ट करतो रोज,
लहानपणीचं ते एकमेकांना कुरवाळणं,
आजही आठवलं की हृदय भरून येतं! 💫

92. त्या लहानशा हातांनी बांधलेली राखी,
आजही माझ्या मनात कोरली गेलीये,
भांडलो, हसलो, रडलो – पण एकमेकांसाठी उभं राहिलो,
हे नातं म्हणजेच खरं जीवाचं नातं! 🤗

93. राखीच्या एका धाग्यात दडलेलं हजारो आठवणींचं प्रेम,
लहानपणाची मस्ती, मोठेपणाचं समजूतदारपण,
कधी तू माझ्या पाठिशी, तर कधी मी तुझ्या,
हे बंधनच असं आहे – जे कधीच तुटणार नाही! 🌸

94. प्रत्येक हसण्यात, रुसण्यात,
आपलं नातं अजूनच फुलत गेलं,
राखीच्या एका धाग्यानं
आपलं नातं आयुष्यभरासाठी बांधून ठेवलं! 🌈

95. लहानपणीच्या खेळांतून ते आजच्या आठवणींपर्यंत,
आपलं नातं प्रत्येक क्षणाला नवीन वळण घेत गेलं,
राखीचा तो धागा माझ्या जिवापाड भावाच्या आठवणींनी सजलेला आहे,
आजही मनात गहिवर येतो! ❤️🔥

96. एक राखी – आणि लाख भावना,
तुझं ते रागावणं, माझं ते मनवणं,
आपल्या भांडणांतही प्रेम दडलं होतं,
भाऊ, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे! 🫶

97. राखी म्हणजे फक्त सण नाही,
ती आपल्या नात्याची एक सुंदर आठवण आहे,
तुझं प्रत्येक ‘मी आहे ना’ म्हणणं –
माझ्यासाठी एक आशीर्वादच आहे! 💌

98. भांडणं, टिंगल, थट्टा – हे सगळं तुझ्यासोबतच गोड वाटतं,
राखीचा धागा बघितला की लहानपण डोळ्यासमोर येतं,
आपलं नातं कायमच असंच राहो,
अस्सल, प्रेमळ, आणि जिव्हाळ्याचं!

99. जन्माला आलो तेव्हा एकटं वाटलं,
पण तू भावंड म्हणून भेटलास आणि आयुष्य बदललं,
राखीच्या निमित्तानं हे सांगायचं होतं –
माझ्यासाठी तू फक्त भाऊ नाही, तर एक मित्र, आधार आणि हिरो आहेस! 🌟

100. बहीण-भावाच्या नात्याची ही रेशीमगाठ,
आयुष्यभर राहो प्रेमाची ही गाठ!
माझ्या लाडक्या भावा, तुला दीर्घायुष्य लाभो,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

101. ताई-दादाचं नातं हे, गोड साखरेसारखं,
लुटूपुटूच्या भांडणांनी, अजूनच गहिरं होतं!
तुझी साथ असेपर्यंत, कशाची भीती नाही,
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा, माझ्या दादा!

102. दूर असलो तरी, आठवण तुझी येते रे,
राखीच्या धाग्यात, प्रेम माझं धावते रे!
तुझ्या सुखासाठी, देवाकडे मागते मी,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या भावा!

103. बहिणीच्या डोळ्यात, कधी पाणी येऊ नये,असं वचन देतो,
माझा भाऊ शूर आहे!
या पवित्र दिनी, रक्षण करण्याचे वचन,असं वचन देतो,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय भावा!

104. आठवणींच्या क्षणांनी, भरलेलं आपलं नातं,
सुख-दुःखात सोबत, तू खरा सोबती!
तुझ्या मायेची ऊब, कायम अशीच राहो,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

105. बालपणापासूनची, ही प्रेमाची साथ,
प्रत्येक संकटात, तूच दिलीसमात मात !
तुझ्यासारखा भाऊ, मिळायला लागत भाग्य,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, माझ्या जिवाभावाच्या भावा!

Raksha Bandhan Wishes in Marathi for Sister

106. तुझं अस्तित्व म्हणजे माझं बळ,
तुझं हास्य म्हणजे माझं समाधान,
राखीच्या दिवशी एवढंच म्हणावसं वाटतं —
“तू आहेस म्हणून मी आहे!”
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💝

107. राखीचा धागा हातात बांधलास की,
वाटतं प्रत्येक त्रास लांब गेला,
तुझ्या मायेच्या धाग्यातच जपलंय माझं अस्तित्व,
Happy Raksha Bandhan, माझ्या जीवाभावाच्या बहिणीसाठी! 🌸

108. लहानपणीचे भांडणं, मधली मस्ती,
आज आठवलं तरी डोळे भरून येतात,
राखीचा दिवस म्हणजे त्या आठवणींचा महाउत्सव!
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा! 🪷

109. नातं आपलं असं काही खास आहे,
कधी शब्दात सांगताच येत नाही,
पण राखीच्या एका धाग्याने सगळं व्यक्त होतं…
तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💫

110. तुझं रक्षण करणं ही जबाबदारी नाही,
तर माझं भाग्य आहे,
तुझ्या प्रत्येक अश्रूसाठी मी उभा राहीन,
Happy Rakhi my dearest sister! 🛡️

111. फुलांसारखं कोमल आणि शिल्पासारखं मजबूत,
असं आपलं नातं — भाव-बहिणीचं,
राखीचा धागा जरी लहान असला,
तरी त्यामागचं प्रेम असीम आहे!
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 🌷

112. एक राखी, एक आठवण,
एक भाव, आणि एक हसवणारी साठवण,
या नात्याचं मोल अनमोल आहे,
रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा! 🤗

113. भावाच्या प्रेमाला शब्द लागत नाहीत,
बहिणीच्या हसण्यातच तो व्यक्त होतो,
राखीच्या दिवशी फक्त इतकंच —
“तू माझं जग आहेस!” ❤️
Happy Raksha Bandhan!

114. कधी भांडण, कधी हसणं,
कधी रडणं, कधी मस्करी…
पण शेवटी एकच गोष्ट खरी —
तुझ्या राखीच्या धाग्याशिवाय मी अधुरा आहे!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

115. तुझी आठवण म्हणजे माझं हसू,
तुझी राखी म्हणजे माझं बळ,
तू दूर असलीस तरी मनात तू जवळच आहेस,
Happy Raksha Bandhan, बहीण माझी लाडकी! 🌹

रक्षाबंधन शुभेच्छा फोटो | Happy Raksha Bandhan Wishes Images

Happy Raksha Bandhan Wishes Images 1
Happy Raksha Bandhan Wishes Images 1

116. राखी बांधताना, ओठांवर हसू आले,
तुझ्या दीर्घायुष्यासाठी, डोळे पाणावले!
हे बंधन जन्मोजन्मीचे, असेच राहो अतूट,
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा, माझ्या लाडक्या भावा

Happy Raksha Bandhan Wishes Images 2
Happy Raksha Bandhan Wishes Images 2

117. एक धागा प्रेमाचा, एक वचन रक्षणाचे,
हेच तर आहे सार, आपल्या पवित्र नात्याचे!
तू सुखी रहा नेहमी, हीच माझी कामना,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes Images 3
Happy Raksha Bandhan Wishes Images 3

118. कितीही भांडलो तरी, प्रेम कधी कमी होत नाही,
बहिणीच्या हाकेला, भाऊ धावून येतोच!
आपल्या नात्याची ही शान, अशीच राहो,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes Images 4
Happy Raksha Bandhan Wishes Images 4

119. तूच माझा आधार, तूच माझा विश्वास,
तुझ्याशिवाय जगणं, वाटे मला उदास!
या राखीच्या सणाला, हीच माझी इच्छा,
मोठे व्हावे तू खुप,हिच मनी आस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, माझ्या भावा!

Happy Raksha Bandhan Wishes Images 5
Happy Raksha Bandhan Wishes Images 5

120. चंद्रासारखा शीतल, सूर्यासारखा तेजस्वी,
असा माझा भाऊ, माझ्यासाठी खूप खास!
तुझ्या प्रत्येक पावलावर, यश असो,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या भावा!

इतर शुभेच्छांसाठी खालील लेख वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top